राज्य उत्पादन शुल्कची सिंहगड कासुर्डेसह अन्य ठिकाणी हातभट्ट्यांवर छापेमारी
१ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे : अगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्या पुणे विभागाच्या कार्यालयाची मावळ (जि. पुणे) तालुक्यात अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मीती विरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक पुणे विभागाच्या पथकाने निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु निर्माती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने धडक मोहीम हाती घेतली असून मावळ (जि. पुणे) तालुक्यामधील सिंहगड कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभटटी दारु निर्मीतीच्या एकुण ३ ठिकाणांवर दारुबंदी गुन्हयाअंतर्गत छापे मारुन ३ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. कारवाईमध्ये १०५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, ३६०० लिटर रसायन व गावठी हातभटटी दारु निर्मीतीचे इतर साहीत्य असा एकुण अंदाजे रुपये १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढे देखील अवैध दारु व्यवसायाविरुध्द अशाच प्रकारच्या मोहिमा सुरु राहणार असल्याचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी सांगितले.
सदराची कारवाई दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि. एम. माने, जवान पी.टी. कदम, एस. एस. पोंधे, ए. आर. थोरात, एस. सी. भाट, आर. टी. तारळकर, महिला जवान यु. आर. वारे, ए.आर. दळवी या पथकाने केली आहे. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र धोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व्हि.एम माने व दुय्यम निरीक्षक ए.बी. पाटील हे करीत आहेत.