Video : महायुतीच्या उमेदवाराला वाघोलीतून १० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देणार

भाजपा वाघोली प्रभारी तथा हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक

वाघोली : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून इच्छुक उमेदवार पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. विशेषतः बारामतीबरोबरच शिरूर लोकसभा मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. भाजपाकडून महायुतीचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने कसा निवडून आणता येईल यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील सज्ज झाले आहेत.

महायुती व घटक पक्षाच्या उमेदवाराला वाघोलीमधून दहा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा दावा भाजपा वाघोली प्रभारी तथा हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक यांनी केला आहे. मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाघोली मधून पाच हजाराहून अधिक मताधिक्य दिले होते. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार व ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा घेवून याही वेळी वाघोली मधून दहा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा दावा भाजपा वाघोली प्रभारी विजय जाचक यांनी केला आहे. शिरूर लोकसभा कोण खेचून आणतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button