उमेदवारी न मिळाल्यामुळे मुळीक समर्थक नाराज 

कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर केली जात आहे पोस्ट व्हायरल

येरवडा : (उदय पोवार) भाजप कडून पुणे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झाल्यामुळे इच्छुक असलेले माजी आमदार जगदीश मुळीक समर्थक नाराज झाले आहेत. वडगावशेरी मतदार संघातील मुळीक यांच्या कार्यालयात मोठयासंख्येने समर्थकांनी उपस्थिती लावून नाराजी व्यक्त केली. परंतु माजी आमदार मुळीक यांनी कार्यकर्त्यांना शांत रहाण्याचा सल्ला दिला आहे.

पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक पुणे भाजपचे शहर अध्यक्ष  असल्यापासून तयारीत होते. शहराध्यक्ष पद गेल्यानंतर मागील वर्ष भरात त्यांनी  मॅरेथॉन स्पर्धा, बागेश्वर महाराजांचा सत्संग, जया किशोरी यांची राम कथा, आरोग्य शिबिर, विकास परिषद असे विविध कार्यक्रम तसेच होर्डींग लावून प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले होते. मुळीक आणि मोहोळ यांच्यात उमेदवारी वरून चुरस निर्माण झाली होती. अखेर मोहोळ यांच्यावर शिक्कमोर्तब झाले.

उमेदवारी न मिळाल्यामुळे वडगांवशेरी मतदार संघातील माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मुळीक यांच्या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी उपस्थिती लावून नाराजी व्यक्त केली.

यावर मुळीक यांनी मात्र आपल्याला पक्ष नेतृत्वाने पुढील काळात योग्य ठिकाणी संधी देणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मुळीक आता भाजपचे उमेदवार मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होणार का? याकडे वडगावशेरी मतदार संघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

फेसबुक पोस्ट चर्चेत…

कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी  आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. जनतेच्या सेवेत कायम असल्याचे मुळीक यांनी गुरुवारी (दि. १४ मार्च) फेसबुकवर पोस्ट करून भावना व्यक्त केली आहे. सदरील पोस्ट त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर

अन् सर्व पदे कोथरूडलाच मिळत असल्याने पूर्व भागातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. भाजप पक्ष कार्यकर्त्यांची व समर्थकांची नाराजी कशी दूर करणार याकडे लक्ष लागले आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button