Trending

वाघोलीतील जिल्हा परिषद शाळेला अवैध धंद्यांचा विळखा

वाघोलीचे जेष्ठ नेते राजेंद्र सातव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून बांधकाम केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अवैध धंद्यांचा विळखा असून या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केली केली आहे.

वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास एकूण 60 लाख रुपये खर्चून पुणे नगर महामार्गाला लागून चार खोल्या बांधून जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा ग्रामपंचायतीच्या वतीने उभी करण्यात आली आहे. या शाळेच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे व कार्यकारी मंडळ यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे पुणे महामार्गाला लागून जवळपास चार खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषद शाळेचे करण्यात आले.

सद्यस्थितीत इंग्रजी शाळांपेक्षा जिल्हापरिषद शाळांकडे कल वाढू लागल्यामुळे नवीन बांधकाम करण्यात आलेली जि.प. शाळा वाघोलीच्या वैभवात भर टाकणारी आहे. मात्र या शाळेच्या भोवती जवळपास शंभर मीटरच्या अंतरावर देशी-विदेशी दारूची दुकाने तसेच मान्यताप्राप्त रेस्टॉरन्ट आणि बार असल्यामुळे मद्यपींचा त्रास जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. यासाठी राज्य उत्पादन शुल्क, तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाने या ठिकाणी तातडीने कारवाई करून अवैध धंद्यांचा नायनाट करावा अशी मागणी वाघोलीचे ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वाघोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विद्यार्थ्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण करणारी ही शाळा असल्याचे सातव यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने इमारत प्रशस्त करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचा मानस चांगला असला तरी अवतीभोवतीच्या परिसरामुळे व महामार्गालगत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाल्यामुळे शाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. विद्यार्थी पालक यांच्या प्रवेशाचे बॅनर या शाळेच्या आवारात पहावयास मिळत आहेत.

विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणाऱ्या या शाळेबाबत जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन कोणत्या उपाययोजना करते हे आगामी काळात पहावे लागेल.

ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास साठ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शाळा ही पुणे-नगर महामार्गाला लागून असल्याने शाळेत ये-जा करताना विद्यार्थी व पालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच या शाळेच्या अवतीभवती शंभर मीटरच्या अंतरावर अवैध धंद्यांना ऊत आल्याने त्यावर देखील तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. – राजेंद्र सातव पाटील (माजी उपसरपंच, वाघोली)

वाघोली येथे वार्ड क्रमांक दो मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात आलेली शाळा महामार्गाला लागून आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांसाठी पार्किंगची व्यवस्था तसेच रस्ता ओलांडण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये ठराव संमत करण्यात आला आहे. – सुधीर भाडळे (ग्रा.पं. सदस्य वार्ड क्रमांक 2, वाघोली)

वाघोली येथील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे. – प्रताप मानकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद)

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button