येरवड्यात महाशिवरात्र निमित्त तारकेश्वर मंदिरात लाखो भाविकांनी घेतले दर्शन

समस्त गावकरी मंडळी ट्रस्ट तर्फे चोख नियोजन

येरवडा : प्रतिनिधी 

येरवडा येथील पांडवकालीन तारकेश्वर डोंगरावर महाशिवरात्र निमित्त भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री बारा वाजलेपासून अभिषेका नंतर दर्शनाला सुरवात झाली, दिवस भरात सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती येरवडा समस्त गावकरी ट्रस्टचे अध्यक्ष सुहास राजगुरू यांनी दिली.
येरवड्यातील डोंगरावर असणारे तारकेश्र्वर पांडव कालीन पुरातन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त रात्री बारा वाजले पासून नागरिकांसाठी दर्शनाला मंदिर खुले करण्यात आले. भक्तांची रात्री पासून पिंडीचे दर्शना घेण्यासाठी गर्दी झाली होती. दिवसा उन्हाचे कडाका रांगेतील भाविकांना बसू नये यासाठी ठिक ठिकाणी कापडी तंबू टाकण्यात आले होते. मंदिराच्या हॉल मध्ये दर्शन बारी ठेवण्यात आली होती. भाविक मनोभावे दिवस भर दर्शन घेत होते.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापुसाहेब पठारे, रामभाऊ मोझे, शिवसेनेचे उपनेते मिलिंद मिर्लीकर, शहर प्रमुख संजय मोरे आदी मान्यवरांनी तारकेश्र्वराचे दर्शन घेतले.
भाविकांसाठी शिवसेना उपशहर प्रमुख आनंद गोयल यांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वर मोझे यांनी उपवासाचे साबुदाणा वडे, चिवडा वाटप केले. सुरेश शेलार यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती.
महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाची सोय समस्त गावकरी मंडळी ट्रस्ट चे अध्यक्ष सुहास राजगुरू, सेक्रेटरी सुधीर वांभुरे, उपाध्यक्ष संतोष राजगुरू, श्रीकांत मोझे, बलभीम राजगुरू, नितीन राजगुरू, शंकर मोझे, दीपक फुगे, शैलेश राजगुरू, रुपेश घोलप, यासह स्वयंसेवक, येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस यांनी परिश्रम घेतले.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button