Video: ब्रेकिंग! पुणे मनपा अधिकाऱ्याच्या टेबलमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल
काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लागले लक्ष

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या पथ विभागातील उपअभियंता यांच्या टेबलमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. आपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारानंतर उपअभियंता पैसे घेऊन गायब झाला.
मार्च महिन्यात ठेकेदार, अधिकारी यांच्यात बिल काढण्यावरून पैशांची देवाण घेवाण सूरू असते. त्याचे तर पैसे नाहीत ना? अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी अँटी करप्शन विभाग, पुणे पोलीसांकडे तक्रार दिली असून यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचाराबाबत समाजमाध्यमातून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.