खून करून दोन वर्षे फरार झालेल्या आरोपीला अटक
येरवडा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

येरवडा : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षा पासून फरारी असणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अनिकेत ऊर्फ उ-या आकाश उरणकर (वय २५, रा. गंगाधाम चौक, मार्केट यार्ड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत २०२२ साली खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यात दोन वर्षा पासून फरार असणारा आरोपी अनिकेत उर्फ उ-या आकाश उरणकर हा बर्निग घाट कोरेगाव पार्क येथे थांबलेला आहे.
पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे व तपास पथकाचे अंमलदार तेथे गेले असता, संशयीत रित्या एक इसम थांबलेला दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारता अनिकेत उर्फ उ-या आकाश उरणकर असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता खुनाच्या गुन्हयाची कबूली दिली. त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यास पुढील कार्यवाहीसाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस, निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केली.