पोस्टमन नामदेव गवळी यांना ‘उत्कृष्टता’ पुरस्कार

पोस्टल लाईफ इंशुरन्समध्ये विक्रमी कामगिरी; एकाच महिन्यात मिळविला तब्बल तीस लाखांपेक्षा जास्त प्रीमीयम

Story Highlights
  • फायदेशीर आणि खात्रीशीर असणारा पोस्टल लाईफ इंशुरन्स 1 फेब्रुवारी 1884 साली जनसेवेस उपलब्ध झाला. 2017 पूर्वी केवळ सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनाच हा इंशुरन्स घेता येत होता. परंतु 2017 नंतर सरकारने सामान्य जनतेसाठी म्हणजे पदवीधर अथवा शासनमान्य आयटीआय अथवा सर्टीफाईड कोर्सधारकांना या इंशुरन्सची दारे खुली केली. खाजगी इंशुरन्स पेक्षा नक्कीच लाभदायक आहे. हा इंशुरन्स जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी गवळी यांनी परिश्रम घेतले. सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त प्रीमीयम पोस्ट खात्याला मिळवून दिला.

पुणे : वाघोली टपाल कार्यालयात कार्यरत असलेले पोस्टमन नामदेव गवळी यांनी एकाच महिन्यात तब्बल तीस लाखांपेक्षा जास्त प्रीमीयम मिळवून पोस्टल लाईफ इंशुरन्समध्ये विक्रमी कामगिरी केल्याबद्दल पुणे रिजनचे प्रमुख पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाय व डीपीएस सिमरन कौर यांच्याकडून ‘उत्कृष्टता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी सामाजिक कार्याबरोबरच पोस्टाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवणारे पोस्टमन ओळखले जातात. मागच्या महिन्यात घेण्यात आलेल्या पोस्टल लाईफ इंशुरन्स ड्राईव्हमध्ये गवळी यांनी पोस्टल इंशुरन्सची ठिकठिकाणी माहिती दिली होती. शाळा, कॉलेज तसेच वेगवेगळ्या सोसायटींमध्ये लोकांना लाईफ इंशुरन्सचे फायदे समजावून सांगितले होते. सर्वात कमी प्रिमीयम व सर्वात जास्त बोनस मिळवून देणारा पोस्टल लाईफ इंशुरन्स आयकरात सुद्धा सूट मिळवून देतो याबाबतची माहिती गवळी यांनी मोठ्या परिश्रमाने नागरिकांपर्यंत पोहचवून सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त प्रीमीयम पोस्ट खात्याला मिळवून दिला. गवळी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल वरिष्ठांच्या हस्ते ‘उत्कृष्टता’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

पोस्टाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. घेतलेल्या परिश्रमामुळे पुरस्काराचा मानकरी ठरलो. वरिष्ठांच्या हस्ते मिळालेला ‘उत्कृष्टता’ पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे.

– नामदेव गवळी  (पोस्टमन, वाघोली)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button