भाजपच्या ‘गाव चलो अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक यांची माहिती; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग

वाघोली : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘गाव चलो अभियान’ राबवण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून वाघोली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या गाव चलो अभियानास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजप हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक घरामध्ये पोहचवण्यासाठी ‘गाव चलो अभियान’ सुरु करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून गाव चलो अभियानाला सुरुवात शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील वाघोली गावातील बूथ वरती जावून स्थानिक बुथ कार्यसमिती यांच्या उपस्थितीत घरोघरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहचवली जात आहे. बुथ बैठक करून बुथवरील १८ विविध कार्ये पुर्ण करण्यासंदर्भात रचना लावण्यात आली असल्याची माहिती जाचक यांनी दिली.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button