मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
नेहा शिंदे यांचेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

पुणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहगाव (प्रभाग क्र. ३) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वडगावशेरी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा नेहा शिंदे यांचेकडून वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवतीसेना प्रमुख शर्वरी गावंडे, निवृत्त पोलीस उपधीक्षक विठ्ठल शिंदे, संजोगीता कुमार, अलका अभंगे, श्रुती दुबे उपस्थित होते.