जेष्ठ नागरिकाची केली २४ लाखांची फसवणूक   

दोघांना अटक; हडपसर पोलीस तपास पथकाची कामगिरी 

पुणे : कुटूंबापासून लांब राहत असल्याचा फायदा घेवून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून चोवीस लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक करणाऱ्या दोघांना हडपसर पोलीस तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून अटक केली आहे.

इफ्तीकार रहीमखान पठाण (वय ३१ रा. गौतम नगर गोवंडी, मुंबई), मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय ५२ रा. काळेपडवळ, हडपसर पुणे, मूळ रा. पातुर जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहल अशोक झरेकर (रा. मगरपट्टा सिटी रोड, हडपसर पुणे) सध्या बेंगलोर कर्नाटक येथे राहतात. त्यांचे वडील अशोक शंकर झरेकर त्यांच्यापासून लांब राहतात. ते राहत असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत असलेला इसम त्यांच्या दैनंदिन कामामध्ये मदत करायचा. झरेकर यांनी खात्यावरून ट्रांजेक्शन झालेल्या रक्कमेबाबत बँकेकडून पडताळणी केली असता त्यांना धक्काच बसला. खात्यातील २४ लाख ४८ हजार रुपये इफ्तीकार खान व नूर जहॉं यांचे बँक खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यांनतर वॉचमन म्हणून काम करत असलेला हनीफ काम सोडून फरार झाला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्नेहल झरेकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने हडपसर पोलीस तपास करत होते. परंतु संशयितांचे मोबाईल बंद होते. पोलिसांच्या तांत्रिक तपासामध्ये हनीफ व इफ्तीकार खान एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. संशयितांबाबत उपायुक्त माहिती मिळवून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी व चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, गायत्री पवार या पथकाने मुंबई येथे जाऊन इफ्तीकार पठाण यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तर मोहम्मद हनीफ यास काळेपडवळ हडपसर येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी नात्याने एकमेकांचे मेव्हुणे असून मोहम्मद हा सुरक्षारक्षक म्हणून काम होता. अशोक झरेकर हे कुटुंबापासून वेगळे राहत असल्याचे इफ्तीकार पठाण याला मोहम्मद कडून समजले होते. त्यामुळे या दोघांनी संगनमत करून अशोक झरकर यांचेसोबत ओळख वाढवली व त्यांना व्यसनाच्या आहारी नेवून मोबाईलचा व बँकिंग अॅक्सेस घेतला. त्यानंतर झरकर यांच्या खात्यातून स्वतःच्या व नातेवाईकांच्या खात्यावर २४ लाख ४८ हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३१ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील,  पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हमन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, तेजम पांडे, गायत्री पयार, चंद्रकांत रेजितबाद, अमोल दणके, कुंडलीक केसकर यांनी केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button