विविध ठिकाणी गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी  

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाई; ७ लाख ९० हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त सागर थोमकर यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारु निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने मोहीम सुरु केली आहे. शनिवारी व रविवारी विविध ठिकाणी अवैद्य गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी करून आठ गुन्हे दाखल केली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने शनिवारी (दि. १०) व रविवारी (दि. ११) अवैध दारु निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या पुणे जिल्हयातील सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळीब, राजेवाडी व आंबळ आदी ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये एकूण ५ वारस व ३ बेवारस एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. सदर कारवाईमध्ये ९९५ लिटर गावठी हातभट्टीची दारु, २५ हजार लिटर रसायन, ३ दुचाकी वाहने तसेच हातभटटी दारु निर्मीतीचे साहीत्य असा एकुण अंदाजे ७ लाख ९० हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून फरार झालेले असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. यापूढे देखील अशाच प्रकारची मोहिमा सुरु राहणार असून अवैध दारु व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.

सदराची कारवाई दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि. एम. माने, जवान एस. एस. पोंधे, ए. आर. थोरात, महिला जवान यु. आर. वारे, ए. आर. दळवी यांनी केली आहे. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील व दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने करीत आहेत.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button