जेल पोलिसाने स्वतावर गोळ्या झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न
फेसबुक पोस्ट मध्ये केला वरिष्ठांचा उल्लेख

सोलापूर: सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. जेलमधील शिपाई विकास गंगाराम कोळपे (वय ३४, नेमणूक, सोलापूर जिल्हा कारागृह, रा. कारागृह वसाहत, सोलापूर) या कारागृह कर्मचाऱ्याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी फेसबुकवर स्वतःचा फोटो आणि स्वतःलाच श्रद्धांजली अर्पण करून आत्महत्या करत असल्याची पोस्ट करून स्वतःवरच गोळ्या घालून घेतल्या. कारागृह कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःची जन्म तारीख आणि मृत्यू तारीख लिहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करून आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती पोस्ट केली. कोळपे यांच्यावर रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.