Video: सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न
लोहगाव रोडवरील पवार वस्ती येथील घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

पुणे/लोहगाव : वाघोली-लोहगाव रोडावरील मुख्य रस्त्यांवरील पवार वस्ती येथे चोरट्यांनी सोन्याचे दुकान (दि. २३ फेब्रुवारी) फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना पहाटे साडे पाच वाजता घडली असून सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे.
दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी मोठ्या कैचीच्या सहाय्याने सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू कुलूप तोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त यांनी या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.