सोळू येथे लक्ष्मी मेटल कारखान्याजवळ अचानक लागली आग

आगीमुळे एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी; वाहनांसह घरांचेही झाले नुकसान

पुणे : आळंदी-मरकळ रस्त्यावरील सोळू गावच्या हद्दीतील लक्ष्मी मेटल या कारखान्याचे जवळ विद्युत रोहीत्राला अचानक आग लागली. लागलेल्या आगीत अनेक वाहने, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. एक जण ठार झाला असून सातजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोळू गावात घडली आहे.

आगीमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर ठिकाणी पोलीस, महसूल अधिकारी, स्थानिक नागरिक, महापालिका, नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क केला. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी सुमारे ४ किमीपर्यंत धुरांचे लोट पसरले होते. याप्रकरणी विद्युत वीज महावितरण कंपनीने आगीशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. लक्ष्मी मेटल या सोळूतील कंपनीच्या परिसरात झालेल्या भीषण स्फोटामध्ये वाहन चालकाचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. ही घटना गुरुवारी (दि. ८ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. आळंदी पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. स्फोटाने सुमारे चार किमी परिसर हादरला असून मोठी हानी टळली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेमध्ये भीषण स्फोट झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्ती, वाहने व घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. तर रस्त्यावरून जाणारे सातजण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरील घटना लोक वस्तीमध्ये घटना घडली आहे. स्फोट झाला त्या परिसरात अल्युमिनियम प्लेट तयार करणारा कारखाना आहे. सदर कंपनी अनेक वर्ष बंद असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्या ठिकाणी असलेल्या रोहित्रावरून वीज जोडणी देण्यात आली होती. मात्र वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा बंद असल्याचा महावितरणचे दावा केला आहे. कंपनीत स्फोट होऊन डीपीस आग लागली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. यावेळी घडलेल्या घटनेनंतर परिसरातील रुग्ण वाहिका आणि अग्निशामक यंत्रणा तसेच सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी तात्काळ घटना स्थळास भेट देऊन मानवसेवेच्या भावनेतून मदत केली. एका व्यक्तीला मात्र या दुर्दैवी घटनेत जीव गमवावा लागला.

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page