वाघोलीतील कॉम्प्युटर इंजिनियरची ११ लाख १७ हजारांची फसवणूक

ऑनलाईन पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक

वाघोली : वाघोली-लोहगाव रोड परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय कॉम्प्युटर इंजिनियर तरुणाला टेलिग्राम व व्हॉटसअॅपवर मेसेज करून ऑनलाईन पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून सुमारे ११ लाख १७ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या व्हॉटसअॅपवर पार्ट टाईम जॉब बाबत मेसेज करून गुगल मॅप ५ स्टार रेटिंग देण्याचे काम सांगितले. सुरुवातीला ५ स्टार रेटिंग दिल्यानंतर तरुणाच्या खात्यात ३०० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर टेलिग्राम अॅपवरील ग्रुपमध्ये क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले. तरुणाने प्रीपेड टास्क ट्रेडिंगसाठी ११ लाख १७ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा केले. भरलेले पैसे तरुणाने पुन्हा मागितले असता आणखी पैसे भरण्यास सांगितले. सदरचा प्रकार फसवणुकीचा वाटल्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button