पुणे पोलीस आयुक्तांकडून स्थानबद्ध कारवाईचे शतक पूर्ण

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार राजु हनुमंत गायकवाड (वय. ३९ रा. लेन नं.०७ कॅनॉल शेजारी, गंगानगर, हडपसर) या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारास एक वर्षा साठी स्थानबद्ध केलें आहे. पुणे पोलिसांची स्थानबद्धची १०० वी कारवाई आहे.
गायकवाड याने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ४ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गायकवाड याच्या विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. स्थानबध्द करण्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाचक शाखा गजानन पवार, पोलीस उप निरीक्षक राजु बहिरट, शेखर कोळी, दिलीप झानपुरे, योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर दहशत निर्माण करणाऱ्या एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या १ वर्षाचे कालावधीमध्ये एकूण १०० कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये एकूण १०० आरोपींना महाराष्ट्र राज्यामधील विविध कारागृहा मध्ये स्थानबध्द करण्यात आलेले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाचे इतिहासामध्ये प्रथमच इतक्या कमी कालावधीमध्ये अशा स्वरुपाची प्रभावी कारवाई झाली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाया करण्यात येणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त यांनी सांगतले.