घरफोडीतील आरोपी अटकेत

विश्रांतवाडी पोलीस तपास पथकाची कामगिरी; १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

विश्रांतवाडीघरफोडी करणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलीस तपास पथकाने कळस परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडून पोलीसांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रथमेश नितीन भगत (वय २१ रा. गणेशनगर, बोपखेल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरीभाऊ नारायण बेलसरे (वय ५८ रा. कळस, विश्रांतवाडी) यांचे राहत्या घरी चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. बेलसरे यांच्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार विश्रांतवाडी पोलीस तपास पथकाने तपास सुरु केला होता. तपास सुरु असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शेखर खराडे, व संदिप देवकाते यांना त्यांचे बातमीदारामार्फत घरफोडीतील चोरटा हा शिवाजी चौक कळस येथे कळस येथे स्मशानभुमीमध्ये बसला असून त्याचे अंगात रेषा असलेला टी शर्ट व ट्रॅक पॅन्ट घातलेला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. माहितीच्या आधारे तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.  त्याला अटक करून त्याचेकडून गुन्हयातील १ लाख ९ हजार ५०० किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ९ हजार ८४० रुपये असा एकुण १ लाख १९ हजार ३४० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त आरती बनसोडे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी लहु सातपुते, पोलीस उपनिरीक्षक, तपास पथकातील अंमलदार दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, प्रफुल्ल मोरे, संदीप देवकाते, शेखर खराडे यांनी केली आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button