प्रवाशांनो सावधान.! पीएमपीएल मध्ये वाढले चोरीचे प्रकार

बसमध्ये चोरले महिलेचे अडीच लाखाचे दागिने; पोलिसांचे सतर्क राहण्याचे प्रवाशांना आवाहन 

वडगावशेरी : पुणे शहरात बस मधील गर्दीचा फायदा घेत दागिने, मोबाईल, पैसे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. पुरुष, महिलांच्या टोळ्या सक्रिय असून बस मध्ये गर्दी असलेल्या मार्गावर चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकताच एक असा प्रकार मनपा ते वडगांवशेरी बस प्रवासा दरम्यान घडला आहे. महिलेच्या पर्स मधील तब्बल २ लाख ६० हजार रुपयांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केले आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे पत्नीसह पुणे मनपा शिवाजीनगर ते सिध्दीविनायक मंदिर, वडगावशेरी दरम्यान प्रवास करत होते. बस मधील गर्दीचा फायदा घेत बस प्रवासा दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या पत्नीची नजर चुकवुन, त्यांचे जवळील पर्सची चेन उघडुन, त्यामधील २ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले आहेत. पुढील तपास चंदननगर पोलीस अधिक करत आहेत.

गर्दी असलेल्या बसमध्ये प्रवाशांनी पाकिटे, पर्स, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. संशियत व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी अथवा बस वाहकाशी संपर्क साधावा.

– राजेंद्र लांडगे  (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर)  

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button