क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धांच्या सामन्यांनी जिंकली उपस्थितांची मने

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने एसपीएफ क्रीडा स्पर्धेचे आयोजन

खराडी : ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने २७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया २०२३’ या क्रीडा महोत्सवात २ व ३ डिसेंबर रोजी व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप, टेबल टेनिस चॅम्पियनशीप, कॅरम चॅम्पियनशीप, बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशीप, स्विमिंग चॅम्पियनशीप तसेच स्केटिंग चॅम्पियनशीप या विविध स्पर्धा संपन्न झाल्या. खराडी येथील स्पोर्टसेज, पठारे स्टेडियम, फाऊंटेन रोड या ठिकाणी या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या सर्वच स्पर्धांमध्ये खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, धानोरी, येरवडा, लोहगाव येथील विविध सोसायटीतील संघानी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

आजही ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया’ तसेच फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांशी स्पर्धक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून जोडले जात असल्यामुळे आनंद होत असल्याचे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष ‘सुरेंद्र बापूसाहेब पठारे’ यांनी व्यक्त केले.

नुकत्याच पार पडलेल्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत ३०० स्पर्धेक तर टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत २५० स्पर्धेकांनी , कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत २३०, बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत ६०० स्पर्धेकांनी , स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत २५० स्पर्धेक , स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ५०० स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. एकूणच सर्वच संघांनी व खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे उत्तम प्रदर्शन करत सामान्यांमध्ये रंगत आणली. प्रेक्षक नागरिकांना देखील या निमित्ताने चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. एकूणच एसपीएफ क्रीडा महोत्सवात ५०००हून अधिक स्पर्धेकांनी सहभाग घेतला आहे.

‘एसपीएफ स्पोर्ट मेनिया’च्या रूपाने सांस्कृतिक राजधानी असलेल्या आपल्या पुण्यात स्विमिंग (जलतरण), स्केटींग, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बॉक्स फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन व क्रिकेट या मैदानी क्रीडा प्रकारांबरोबरच बुद्धिबळ, कॅरम या बैठी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन होत आहे आणि ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. तसेच, क्रीडाप्रेमी प्रेक्षकांसाठी व खेळाडूंसाठी ही एक पर्वणी आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button