मुख्यमंत्र्यांची चंदननगर येथे खासगी भेट
वास्तुविशारद तज्ञ आनंद पिंपळकर यांच्या निवासस्थानी उपस्थिती

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवार दिनांक २ डिसेंबर रोजी चंदननगर येथे वास्तुविशारद तज्ञ, ज्योतिषाचार्य श्री आनंदराव पिंपळकर यांच्या घरी खाजगी दौरा होता.
रात्री अकरा च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे चंदन नगर येथील हनुमान व्यायाम शाळेच्या पाठीमागे असलेल्या आनंद पिंपळकर यांच्या घरी आगमन झाले. त्यांचे मंत्रोच्चार व पुष्प वृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. पिंपळकर यांनी बांधलेल्या वाड्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी पूजाअर्चा केली. नंतर पिंपळकर कुटुंबीयांच्या सोबत भोजन केले.
यावेळी चंदन नगर येथील हनुमान व्यायाम शाळेच्या परिसरात मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा खाजगी विमानाने मुख्यमंत्री लोहगाव विमानतळा वरून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.