राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचा पुणे दौरा
दोन दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल; वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांची माहिती
पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचा पुणे शहरात दोन दिवस दौरा असणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्या दरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय मगर यानी दिली.
राष्ट्रपतींच्या दिनांक ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ रोजीच्या पुणे भेटी दरम्यान वाहतूक व्यवस्थेत खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत. दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १ ते ४ वाजेपपर्यंत व दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ वाजे पर्यंत पुणे शहरामधुन पुणे विमानतळ येथे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनचालकांनी पुणे नगर रोडवरील रामवाडी ते एअरपोर्ट रोडचा वापर करावा लागणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये लोहगांव ते विमानतळ ते विश्रांतवाडी येण्या-जाण्याच्या मार्गावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते १२ वाजे पर्यंत पुणे सोलापूर रोडवरील भैरोबानाला ते जेधे चौक (स्वारगेट) व भैरोबानाला ते पुणे स्टेशन (मोर ओढा मार्गे) या दोन्ही रस्त्यावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.
दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे विद्यापीठ ते पाषाण रोडवरील रायगड बंगला हा एकेरी मार्ग तात्पुरत्या स्वरूपामध्ये ३ ते ४ दरम्यान फक्त व्ही.व्ही.आय.पी. सांठी दुहेरी करण्यात येत आहे. वाहनचालकांनी दोन दिवस पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन उपआयुक्त विजय मगर यांनी केले आहे.