धान्य वाटपातील काळा बाजार थांबवा

पुणे मनपा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी; मुख्य अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

पुणे :  स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे पुरेसे वाटप करावे. तसेच धान्य वाटपातील काळा बाजार थांबवावा अन्यथा अन्न धान्य वितरण व पुरवठा कार्यालयासमोर नागरिकांसह तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्याचबरोबर दुकानदारांना चुकीच्या कामात अभय देणाऱ्या शिधापत्रिका कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी डॉ. धेंडे यांनी मुख्य अन्न धान्य वितरण अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, पुणे शहरातील शिधा वाटप केंद्रामार्फत धान्याचे पुरेसे वाटप केले जात नाही. नागरिकांकडून सातत्याने अशा तक्रारी येत आहेत. शिधापत्रिका कार्यालयाच्या येरवड्यातील ई विभाग अंतर्गत नागपूर चाळ आणि हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी चार स्वस्त धान्य वितरणाचे दुकान आहे. या दुकानांमधून शासन मार्फत प्रति युनिट येणारे धान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे चालू असल्याची साशंकता निर्माण आहे. या संबंधीत अधिकारी व दुकानदारांची चौकशी करून अन्नधान्याचा काळाबाजार व भ्रष्टाचार होत असेल तर त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

स्वस्त धान्य दुकानाला शासनामार्फत होणारा पुरवठा व दुकानदाराकडून होणारे वितरण यांची माहिती दर्शनीय भागात लावावी. नागरिकांना धान्य वितरीत केल्यानंतर पावती मिळत नाही. जर एका घरात पाच व्यक्ती असतील तर त्यांना दोनच व्यक्तीचे धान्य दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. इतर व्यक्तीचे धान्य काळ्या बाजाराने विकले जात आहे. याबाबत चौकशी करून लवकरात लवकर कार्यवाही करून लाभार्थीयांना पुरेसे धान्य देण्यात यावे अन्यथा कार्यालयासमोर गरिबांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button