Trending

कोयत्याने वार केल्याने तरुणाचा मृत्यू

वाघोलीतील बकोरी रोडवरील घटना

वाघोली : वाघोलीत एकवीस वर्षीय मुलावर कोयत्याने वार केल्याने जखमी तरुणास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील बकोरी रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून लोणीकंद पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. २८ नोव्हेंबर) सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे २१ वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने सदर जखमीस रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला. सदर युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वाडेबोल्हाई येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. तरुणाला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या साक्षीदारास, ज्याने त्याला मारले त्या आरोपीचे नाव व सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचे कळवले होते. त्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार सदरची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याची दाट संशय व्यक्त केल्या जात आहे. परंतु हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी तपास करत आहेत. जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीचे सविस्तर वर्णन मिळवण्यात आले असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता असल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी सांगितले. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येत आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button