‘मोस्ट वॉन्टेड’ दरोडेखोर जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी; एकूण ९ गंभीर गुन्हे उघडकीस

पुणे : पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दरोडा व घरफोडी करणारा अभिलेखावरील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले आहे.
सोनू ऊर्फ संजिव कपुरसिंग टाक (वय २८ वर्षे रा. गाडीतळ, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या सारखे गंभीर गुन्हे वाढले असून गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्तीवर असताना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सराईत मांजरी बु. स्मशानभूमीजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोना नितिन मुंडे यांना मिळाली. त्यानुसार युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-६ च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याचा साथीदार पंकजसिंग दुधानी (रा. अंबरनाथ) याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचेकडून सोन्या, चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकुण २ लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विमानतळ, येरवडा, हडपसर, लोणीकंद, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकुण ९ गंभीर गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने उघडकीस आणले आहेत.
त्याबरोबर कराड (जि. सातारा), रोहा (जि. रायगड), सावर्डे (जि. सांगली), मानवत (जि. परभणी), शेवगाव (जि. परभणी), माणगाव (जि. रायगड), पाली (जि. रायगड), महाड (जि. रायगड), रायसोनी (जि.ठाणे) आदी पोलीस स्टेशनाला मोस्ट वॉन्टेड आरोपी पाहिजे असल्याचे उघडकीस आले आहे.
न्यायालयाने १ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. नमूद गुन्हयातील सोन्याची अंगठी त्याने त्याची आई मिना कपूरसिंग टाक हिला दिल्याने तीचाही गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास युनिट-६ चे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.