पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांचा केसनंद ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

वाघोली : केसनंद (ता. हवेली) गावचे सुपुत्र संजय दौलतराव जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल केसनंद गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
संजय जाधव यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. जाधव सन १९९४ रोजी पोलीस दलात बिनतारी संदेश विभागात भरती झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई, लोहमार्ग खंडाळा, पुणे शहर, सातारा आदि आदी ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सन २०१५ मध्ये नाशिक येथील कुंभमेळा बंदोबस्तमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुणे शहर येथे कर्तव्य करत असताना तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त यांच्यासोबत ऑपरेटर म्हणून उत्कृष्ट काम केले. विविध कामगिरीबद्दल आतापर्यंत त्यांना पोलीस दलाने ४९ विशेष बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या पदोन्नतीवर पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुणे शहर या ठिकाणी कर्तव्यावर आहेत. जाधव यांची पदोन्नती झाल्याबद्दल केसनंद ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.