जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण यांचा आव्हाळवाडी ग्रामस्थांकडून सत्कार

वाघोली : नुकताच पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रमेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. चव्हाण यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच नितीन घोलप, उपसरपंच प्रशांत सातव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, माजी उपसरपंच पिराजी आव्हाळे पाटील, नवनाथ सातव, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष दत्ता (आण्णा) आव्हाळे, पत्रकार सोमनाथ आव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कुटे, संभाजी मोरे, अशोक सातव व ग्रामस्थ उपस्थित होते.