केसनंद फाट्यावरील रस्त्याची दुरुस्ती

जयप्रकाश सातव यांच्या पुढाकाराने वाहनधारकांना मिळाला दिलासा

वाघोली : वाघोलीहून केसनंदकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या खचल्याने व केसनंद फाट्यावर रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच वाहनधारकांना विशेषतः दुचाकी चालकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वाघोली येथील भाजप नेते जयप्रकाश सातव पाटील यांच्या पुढाकाराने साईड पट्ट्या मुरूम टाकून भरण्यात आल्या. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमधून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वाघोली, केसनंद मार्गे जाणारा लोहगाव ते राहू हा राज्य मार्ग आहे. या मार्गावर शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स, कंपन्या, सोसायट्या, बीआरटी स्थानक, पोलीस चौकी आहे. तसेच सोलापूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. केसनंद फाट्यावर दोन्ही बाजूने साईड पट्ट्या खचल्यामुळे व रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जाण्याबरोबरच कोंडीचा सामना करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते सातव पाटील यांच्या पुढाकाराने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. परंतु संबधित विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून दुरुस्ती करावी व कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. वाहतूक विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांचेसह वाहनधारकांनी जयप्रकाश सातव सातव पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button