जि. प. सभापती रुपालीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
दीपक पाटील व संतोष पाटील यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

गोरेगाव : हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक रुपालीताई पाटील यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रमाने सोमवारी (दि. १७ जुलै) साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दीपक पाटील गोरेगावकर व संतोष पाटील गोरेगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच टायगर ग्रुप हिंगोलीच्या सौजन्याने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप व वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात येणार असून मान्यवरांनी उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दीपक पाटील यांनी केले आहे.