महापालिका प्रशासनाकडून ‘मॉक ड्रील’चे आयोजन

दर तीन महिन्याला दिले जाणार आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात आले होते.

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर किती कालावधीमध्ये अग्निशमन दलासह इतर यंत्रणा किती सतर्क आहेत हे मॉक ड्रीलच्या माध्यमातून जाणून घेतले जाते. दर तीन महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून यामध्ये बाकीच्या कंपन्यांचा समावेश केला जाणार आहे. तसेच स्वयंसेवकांसह सामान्य नागरिकांना अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन संकटांचे प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले. टाटा मोटर्सकडून मॉक ड्रीलचे आयोजन केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे, औद्योगिक सुरक्षा महामंडळ सहसंचालक संजय गिरी, टाटा मोटर्स सुरक्षा अधिकारी राकेश पांडे, कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी, आपत्ती नियंत्रक शशिन पाटील, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे प्रतिनिधी संतोष संकपाळ, अबिद सय्यद तसेच कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button