लोणीकंद तपास पथकाची रोड रोमियोंवर कारवाई

शाळा, कॉलेज परिसरात ७ बुलेट व अन्य ९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

वाघोली :  शाळा, कॉलेज परिसरामध्ये घिरट्या घालणाऱ्या रोड रोमियोंवर लोणीकंद पोलीस तपास पथकाने वाहतुक पोलिसांच्या मदतीने सोळा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून कारवाई सत्र सुरूच असल्याने रोमियोंनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

वाघोली येथील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्ण कर्कश आवाज काढून हिरोगिरी करणाऱ्यांवर लोणीकंद तपास पथकाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट, बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वेडीवाकडी गाडी चालवून शाळा व महाविद्यालय परिसरात धुमाकूळ घालणाऱ्यांमुळे पालकांची चिंता वाढली होती. परंतु लोणीकंद पोलीस तपास पथकाने वाहतूक शाखा पोलिसाच्या मदतीने हिरोगिरी करणाऱ्यांना ताब्यात घेवून ७ बुलेट व ९ अन्य वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अशीच कारवाई नियमितपणे सुरु राहावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.

Download in JPEG format

 

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button