गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त
लोणीकंद पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये भावडी गावातील इंद्रायणी नदीच्या पात्रातील गावठी दारूची हातभट्टी पोलिसांनी उध्वस्त केली असून ७० लिटर गावठी दारू व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जागीच नष्ट केले. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ग्रामीण हद्दीमध्ये दारूचे धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ पोलिसांच्या निर्देशानुसार लोणीकंद पोलिसांनी भावडी येथे छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सदरील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोना सागर जगताप, पोशि पांडुरंग माने, आशिष लोहार, मल्हारी सपुरे यांनी केली आहे.