रिंगरोडच्या आर्थिक फायद्यासाठी चुकीच्या चतुःर्सिमा दाखवून प्लॉटची विक्री
तिघांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाघोली : वाडेबोल्हाई येथे रिंगरोडचा आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने चुकीच्या चतुःर्सिमा नमुद करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वैभवी भोसले (रा. खराडी) यांनी फिर्याद दिली असून मनोज पांडे, ममता पांडे, सना इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली भोसले यांनी २०१३ रोजी वाडेबोल्हाई जमीन गट नंबर ४४ मधील प्लॉट नं ११७ ते १२१ मनोज पांडे व ममता पांडे यांना विक्री करून चतु:र्सिमा नमुद केल्या होत्या. परंतु जेव्हा मनोज पांडे व ममता पांडे यांनी सना इनामदार यांना २०२१ मध्ये प्लॉटची विक्री केली तेव्हा त्यांनी भोसले यांनी विक्री करतेवेळी ज्या चतु: र्सिमा खरेदीखतामध्ये नमुद केल्या होत्या त्या चतु:र्सिमा नमुद न करता चुकीच्या चतुःर्सिमा नमुद करून मनोज पांडे, ममता पांडे यांनी सना इनामदार यांच्याशी संगनमत करून रिंगरोड आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने फसवणुक करुन आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.