महिलांना आत्मनिर्भर करणारी तेजस्विनी सारिका पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे गौरवोद्गार
वाघोली : तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले.
तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने वाघोली येथे शिवभोजन थाळी आणि अथर्व मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उद्धाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सारिका पवार यांनी तेजस्विनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महिलांचे यशस्वी संघटन करून त्यांना स्वबळावर आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध व्यवसायभिमुख प्रशिक्षण वर्ग राबून महिलांना स्वावलंबी बनवण्याची महत्वाची भूमिका असल्याचे सांगून सारिका पवार यांचे याप्रसंगी रुपाली चाकणकर यांनी कौतुक केले.
तसेच रुपाली चाकणकर यांनी रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, परिषद सदस्य सुजाता पवार यांनी केलेल्या कार्याबद्दल देखील कौतुक केले. वाघोली मधील आशा वर्कर यांना करोना काळात केलेल्या अविरत सेवेबद्दल तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वाघोली येथील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वार्डन यांना पावसाळी रेनकोटचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी सरपंच संजीवनी वाघमारे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष निरीक्षक भारती शेवाळे, विद्याताई जोशी, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, लोचन शिवले, सुनंदा दाभाडे, वंदना दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा पाचरणे, मीना सातव पाटील, माजी उपसरपंच मंदाताई जाधवराव, माजी सरपंच शिवदास उबाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, प्रदिप वसंत कंद, माजी उपसरपंच समीर भाडळे, कैलास सातव पाटील, राजेंद्र पायगुडे, शोभा हरगुडे,वाघोली तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद भाडळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके, चैतन्य सातव, किरण पवार, विनायक दाभाडे, अतुल शिंदे, लखन भाडळे आदी मान्यवर व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या होते.
वाघोली मधील महिलांचे संघटन करून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची प्रशिक्षण केंद्र उभे करणारी संस्था म्हणून तेजस्विनी सामाजिक संस्था ओळखली जाते. सामाजिक जाणीव ठेवून तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार व त्यांचे इतर सहकारी महिला यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.
– अॅड. अशोक पवार (आमदार, शिरूर-हवेली)