पोक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता
पुणे : अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोक्सो गुन्ह्यातील आरोपीची सत्र न्यायालयाने पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने अॅड. गणेश मस्के पाटील यांनी काम पहिले आहे. तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सुनील हांडे यांनी काम पाहिले आहे.
हडपसर (पुणे) भागात १६ वर्षीय मुलीला आरोपीने तिच्या पालकांच्या ताब्यातुन लग्नाचे आमिष दाखवून, धमकावून पळवून नेले. तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझ्या घरी आपल्याबद्दल सगळं सांगून टाकेल अशी धमकी दिल्याने अल्पवयीन मुलगी भीती पोटी आरोपीबरोबर निघून गेली. आरोपी अल्पवयीन मुलीला दिल्ली येथे घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ३६३, ३७६ व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार हडपसर पोलिसांनी आरोपी याला अटक करून त्याचेविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सुनील हांडे यांनी काम पाहिले. तर आरोपीच्या वतीने अॅड. गणेश मस्के पाटील यांनी युक्तिवाद केला तर सहाय्यक म्हणून अॅड. सोनाली पवार, अॅड. विजय बाविस्कर, अॅड. गुलनाझ पठाण, अॅड. शरद बांदल आणि अॅड. संदिप नायक यांनी काम पाहिले. पुणे येथील सत्र न्यायाधीश वेदपाठक यांनी निकाल देताना पुराव्या अभावी आरोपीस निर्दोष मुक्त केले.