मोहन शिंदे यांची भाजप पुणे जिल्हा सचिवपदी निवड

वाघोली : वाघोली येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते मोहन (आप्पा) शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतेच भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी शिंदे नियुक्तीपत्र दिले आहे.
वाघोली येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते मोहन (आप्पा) रघुनाथ शिंदे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. गरजू व गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर धावून येणारा तरुण सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिंदे यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेणारे शिंदे यांचे सामाजिक कार्यात मोलाचे योगदान आहे. समाज कार्याच्या माध्यमातून शिंदे यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोडली गेलेली नाळ बघता भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिंदे यांची भाजप पुणे जिल्हा सचिवपदी निवड करून जिल्हा स्तरावरील जबाबदारी सोपवली आहे.
पक्षाने सोपवलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणार असून पक्षाचे ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे व पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळणार असून पक्ष संघटन वाढवण्यावर भर देणार आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संपुर्ण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणार आहे.
– मोहन (आप्पा) शिंदे