तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी चौघांना अटक
लोणीकंद पोलीस तपास पथक व गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई

पुणे : वाघोलीतील (ता. हवेली) माया हॉटेलच्या जवळ मोकळ्या मैदानात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने दोघांना तर गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कवडे या तरुणावर जुन्या वादातून कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्री घडली होती. गंभीर गुन्ह्याचा तपास करीत असताना शैलेश उत्तरेश्वर बिडवे (रा. साई सत्यम पार्क) व किशोर चंद्रकांत व्हडले उर्फ आचारी (रा. खांदवेनगर) यांना लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याचबरोबर संतोष उर्फ गट्ट्या तुकाराम आव्हाळे (रा. आव्हाळवाडी) व याचा साथीदार नवनाथ दादाभाऊ गावडे (रा. वाडेबोल्हाई) यांना गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने अटक केली आहे. गावडे यास २०१० मध्ये खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून कोरोना काळामध्ये पॅरोलवर बाहेर आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, अपर पोलीस आयुक्त चव्हाण, पोलीस उपयुक्त पंकज देशमुख, सह पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर, सहाय्यक फौजदार मोहन वाळके, पोना अजित फरांदे, पोना कैलास साळुंके, पोना विनायक साळवे, पोना जाधव, बाळासाहेब तनपुरे, पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी केली केली आहे.